रेट्रो लुकसह लॉन्च झाली Kawasaki W230; GST कपातीनंतर किंमत फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:13 IST2025-11-19T14:09:48+5:302025-11-19T14:13:54+5:30
या बाइकची भारतीय बाजारात Hunter 350 शी स्पर्धा असेल.

Kawasaki ने आपली नवी 2026 Kawasaki W230 बाइक यूके बाजारात अधिकृतरित्या लॉन्च केली आहे. क्लासिक रेट्रो-रोडस्टर डिझाइन असलेली ही बाइक 2026 पासून उपलब्ध होणार आहे. भारतात सध्या कंपनी Kawasaki W175 विकते, परंतु असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, लवकरच W175 ची जागा ही नवी W230 घेऊ शकते.

भारतामध्ये वेगाने वाढत असलेल्या रेट्रो-स्टाइल बाइक्सच्या सेगमेंटमध्ये ही बाइक एक मजबूत दावेदार ठरू शकते आणि Royal Enfield Hunter 350 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सला तीव्र स्पर्धा देऊ शकते.

Kawasaki W230 चे डिझाइन ओल्ड-स्कूल क्लासिक बाइकपासून प्रेरित आहे. त्याचे प्रमुख रेट्रो एलिमेंट्स गोल हेडलॅम्प, क्रोम-फिनिश फ्युअल टाकी, विंटेज लुक देणारे साइड पॅनेल बाइकला पूर्णपणे विंटेज मशीन असल्याची भावना देते. शहरातील राइडसाठी तिचे बॉडी प्रोफाइल सुलभ ठेवण्यात आले असून, उंच किंवा कमी उंचीच्या रायडर्ससाठीही ही सहज वापरता येईल अशी आहे.

Kawasaki W230 मध्ये कंपनीने Kawasaki KLX230 मध्ये वापरलेले 233cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे 18 PS पॉवर, 18.6 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. KLX230 प्रमाणे बेस इंजिन समान असले तरी W230 चा गिअरिंग सेटअप वेगळा आहे, ज्यामुळे ही बाइक अधिक रिलॅक्स, कम्फर्ट-ओरिएंटेड राइडिंग अनुभव देते.

Kawasaki W175 ची किंमत आणि फीचर्स यांच्यातील विसंगतीमुळे ती भारतीय बाजारात लोकप्रिय झाली नाही. मात्र W230 अधिक पॉवरफुल इंजिन, अधिक प्रीमियम डिझाइन आणि आधीपासून लोकलाइज केलेल्या KLX230 चा फायदा, या कारणांमुळे भारतात व्हॅल्यू-फॉर-मनी पर्याय ठरू शकते.

GST 2.0 नंतर KLX230 ची किंमत ₹3,30,000 वरुन ₹1,84,000 एक्स-शोरूम होऊ शकते. ही मोठी घट दर्शवते की, W230 ला देखील भारतात उच्च लोकलायझेशनसह स्वस्तात लॉन्च केले जाऊ शकते. भारतीय बाजारात ही बाइक Royal Enfield Hunter 350, Yamaha XSR155 अशा बाइक्सची स्पर्धा करेल.

















