‘ही’ कंपनी CNG मॉडेल्सवर देत आहे जबरदस्त डिस्काऊंट, पाहा ऑफर्स अन् लिस्ट; ५० हजारांपर्यंत फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 03:30 PM2022-10-05T15:30:57+5:302022-10-05T15:37:12+5:30

Hyundai October 2022 Discount: Hyundai ने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्या कारवर उपलब्ध असलेल्या सवलतींची घोषणा केली आहे.

Hyundai October 2022 Discount: Hyundai ने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्या कारवर उपलब्ध असलेल्या सवलतींची घोषणा केली आहे. फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत कंपनी ही सूट देणार आहे. ज्याचा लाभ ग्राहकांना दिवाळीसह या महिनाअखेरपर्यंत मिळणार आहे.

कंपनी रोख, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस अंतर्गत ही सूट देईल. कंपनी Grand i10 Nios, i20 आणि Aura वर ही सूट देत आहे. विशेष म्हणजे कंपनी CNG मॉडेलवरही ऑफर देत आहे. कंपनीच्या कोणत्या मॉडेलवर किती फायदा होईल हे आपण पाहूया.

Hyundai ग्रँड i10, Nios आणि Aura च्या Turbo मॉडेलवर 48,000 ची सूट देत आहे. सर्व मॉडेल्स 35,000 रुपयांच्या रोख सवलतीसह, 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूटसह उपलब्ध आहेत.

Hyundai Grand i10 आणि Nios च्या CNG मॉडेल्सवर 23,000 ची सूट देत आहे. सर्व मॉडेल्स 10,000 रुपयांच्या रोख सवलतीसह, 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूटसह उपलब्ध आहेत. Hyundai Aura च्या CNG मॉडेलवर कंपनी 13,000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.

Hyundai i20 च्या Magna आणि Sportz व्हेरिअंटवर 20,000 रुपयांची सूट मिळत आहे. यावर 10,000 रुपये रोख आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. (टीप - या कार्सवर मिळणारी ऑफर राज्यानुसार आणि डीलर्सनुसार निरनिराळी असू शकते.)