दमदार 4395cc इंजिन अन् तब्बल 62km चे मायलेज; जाणून घ्या या खास कारचे फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 05:05 PM2023-09-03T17:05:10+5:302023-09-03T17:10:04+5:30

ही कार फुल टँकमध्ये 4271 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.

Best Mileage Car- BMW XM: कार किती मायलेज देते? या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही म्हणाल, 20,25 फार तर फार 30...पण, जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांचे इंजिन खूप लहान असते. पण, मोठे इंजिन असणाऱ्या कार जास्त मायलेज देऊ शकत नाहीत. पण, एक अशी कार आहे, जिचे इंजिन 4.4-लिटरचे आहे आणि ती कार तब्बल 62 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.

काही लोकांना ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण एक अशी कार आहे, जी एवढ्या मोठ्या इंजिनसह 61.9 किलोमीटरचे मायलेज देते. या कारचे नाव बीएमडब्ल्यू एक्सएम (BMW XM) आहे. इतके तगडे मायलेज देण्यासाठी ही कार हायब्रिड टेक्नोलॉजीचा वापर करते.

बीएमडब्ल्यू एक्सएमची किंमत 2.60 कोटी रुपये(एक्स-शोरुम) सुरू होते. यात 4.4-लिटर ट्विन-टर्बो व्ही8 पेट्रोल इंजिन हायब्रिड टेक्नोलॉजीचा वापर झाला आहे. तसेच, यात (653 पीएस/800 एनएम) मिळेल. ही कार 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह येते. यात प्लग-इन हायब्रिड सेटअप दिला आहे.

याचे मायलेज सर्वाधिक आहे. कंपनी, या कारचे मायलेज 61.9 किमी/लिटर असल्याचा दावा करते. एक्सएम 69-लिटर फ्यूल टँकसह येतो. ही कार एका फुल टँकमध्ये 4271 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.

यात 14.9-इंच कर्व्ड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 12.3-इंच डिझिटल ड्रायव्हर डिस्प्ले, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, हेडअप डिस्प्ले, एम्बिएंट लायटिंग, बोवर्स एन्ड विल्किन, 1500-वाट डायमंड साउंड सिस्टम, सहा एअरबॅग्स, एबीएससोबत ईबीडी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस), 360-डिग्री कॅमरा आणि डायनामिक स्टेबिलिटी कंट्रोलसारखे फीचर्स आहेत.

यात एडीएएस आहे, ज्यात फ्रंट कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि अडेप्टिव्ह क्रूज कंट्रोलसारखे फीचर्स आहेत. एकूणच काय, तर ही कार मायलेजपासून सेफ्टीपर्यंत, सर्व बाबतीत एक नंबर आहे.

बाजारात बीएमडब्लू एक्सएमची स्पर्धा ऑडी आरएस क्यू8 आणि एस्टन मार्टिन डीबीएक्सशी आहे. परंतू, मायलेजच्या बाबतीत, या गाडीची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही.