रस्त्याच्या दुरावस्थेने घेतला तरुणाचा बळी; पाथरी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 12:11 PM2021-07-27T12:11:34+5:302021-07-27T12:21:57+5:30

नातेवाईकांनी बैलगाडीमधून तरुणाला उपचारासाठी नेले.

The young man's death by the bad condition of the road; Incidents in Pathri taluka | रस्त्याच्या दुरावस्थेने घेतला तरुणाचा बळी; पाथरी तालुक्यातील घटना

रस्त्याच्या दुरावस्थेने घेतला तरुणाचा बळी; पाथरी तालुक्यातील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देतीन किमीचा चिखलमय रस्ता तुडवत गाठले रुग्णालय पाथरी तालुक्यातील  वाघाळा येथील पारधी वस्तीवरील घटना

- विठ्ठल भिसे 
पाथरी ( परभणी ) : वाघाळा गाव अंतर्गत असणाऱ्या  पारधी वस्तीवरील   एका तरुणाचा रस्त्याच्या दुरावस्थेने बळी घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी ( दि. २६ ) सायंकाळी उशिरा घडली आहे. राजेभाऊ रामा पवार ( ३२ ) असे वेळीस उपचार न मिळाल्याने मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पाथरी तालुक्यातील वाघाळा गावापासून 3 किमी अंतरावर पारधी वस्ती आहे. या वस्तीला जाण्यासाठी अजूनही रस्ता नाही. पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना वाघाळा गावाला येण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागतात. या वर्षी ही पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी या वस्तीवरील राजेभाऊ रामा पवार या युवकाला दुपारी अचानक रक्ताची उलटी झाली .त्यामुळे त्याची प्रकृती खालावत गेली. त्याला वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यासाठी धावपळ सुरू झाली.  

पावसाने रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने गाडी येणे शक्य नव्हते. शेवटी नातेवाईकांनी बैलगाडीमधून त्याला उपचारासाठी नेले. परंतु, चिखलमय रस्त्यातून घेऊन जाताना वेळ लागला. वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका पोहचण्याच्या आधीच युवकाचा मृत्यू झाला. रस्ता चांगला असता तर रुग्णाला वेळेत उपचार मिळाले असते, रस्त्याच्या दुरवस्थेने तरुणाचा बळी घेतला अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. 

Web Title: The young man's death by the bad condition of the road; Incidents in Pathri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.