शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससेवेसाठी ३२ सीटर बस देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

परभणी : शहरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शहर बससेवा सुरू करावी, अशी मागणी येथील जागरुक नागरिक आघाडीने आ.डॉ.राहुल पाटील ...

परभणी : शहरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शहर बससेवा सुरू करावी, अशी मागणी येथील जागरुक नागरिक आघाडीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्याकडे केली. त्यावर ४ सीएनजी ३२ सीटर बस आमदार निधीतून दिली जाईल, असे आश्वासन आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिले आहे.

जागरुक नागरिक आघाडीच्या १०० सदस्यांनी २३ ऑगस्ट रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांची भेट घेऊन शहर बससेवा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यानंतर आ.डॉ. पाटील यांनी महानगरपालिकेचे उपायुक्त रणजीत पाटील यांना बोलावून घेतले. तसेच यासंदर्भात प्रस्ताव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर यांनी प्रास्ताविक केले. आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शहराच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात येत असून लवकरच परभणीकरांच्या सेवेत सिटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शहरातील खासगी ऑटोरिक्षा चालकांकडून मुख्य रस्त्यांवर ये-जा करण्यासाठी १५ ते २० रुपये घेतले जात असले तरी वसाहतींच्या अंतर्गत रस्त्यांवर प्रवाशांना सोडण्यास अतिरिक्त २५ रुपये घेतले जात असल्याने सर्वसामान्यांची लूट होत आहे. त्यामुळे सर्वांना परवडेल अशी सार्वजनिक बससेवा शहरात सुरु करावी तसेच गावठाण हद्दवाढीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ॲड.माधुरी क्षीरसागर यांनी यावेळी केली.

बैठकीस सोपानराव अवचार, प्रशांत ठाकूर, जागरुक नागरिक आघाडीच्या निमंत्रक ॲड.माधुरी क्षीरसागर, सुभाष बाकळे, संतोष आसेगावकर, ॲड.लक्ष्मण काळे, गजानन चौधरी, कर्हाळे, प्रा.सावित्री चिताडे, नीलिमा वाघमारे, विजया कातकडे, सुप्रिया कुलकर्णी, सुहासिनी कावळे, मंगल खामगावकर आदींची उपस्थिती होती.