शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 13:52 IST

बोर्डीकर गटाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही.

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आ. सुरेश वरपूडकर यांची तरउपाध्यक्षपदी हिंगोलीतील राजेश पाटील गोरेगावकर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली आहे. 

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अध्यक्षपदासाठी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे आ. सुरेश वरपूडकर व प्रेरणा वरपूडकर यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी हिंगोली जिल्ह्यातील राजेश पाटील गोरेगावकर यांचा अर्ज दाखल झाला. बोर्डीकर गटाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. निश्चित केलेल्या वेळेत अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज प्रेरणा वरपूडकर यांनी मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदी आ. सुरेश वरपूडकर व उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली. 

बोर्डीकर गटात निराशामाजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचा निवडणुकीत मतदान करण्याच्या अनुषंगाने बँकेत जाण्यास परवानगी मागणी करणारा अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. त्यामुळे बोर्डीकर गटात सोमवारी निराशेचे वातावरण होते. काठावर असलेले संख्याबळ आणखी कमी झाल्याने मतांची जुळवाजुळव होणे या गटास अशक्य वाटत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यावरच या गटाची दारुमदार होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती केली. दांडेगावकर यांनी मंगळवारी सकाळीच राष्ट्रवादीचे सदस्य महाविकास आघाडीसाेबतच राहतील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे साहजिकच वरपूडकर गटासोबतच राष्ट्रवादीचे सदस्य राहणार असल्याने आ.दुर्राणी हे नाराज होवून पाथरीला निघून गेले. परिणामी बोर्डीकर गटाचे बँकेचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँक