शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त ट्रॉलीला धडकल्याने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST

सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथील विठ्ठल गणपत लांडगे व त्यांचा भाऊ अतुल गणपत लांडगे हे दोघे भाऊ नैकोटा येथून ...

सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथील विठ्ठल गणपत लांडगे व त्यांचा भाऊ अतुल गणपत लांडगे हे दोघे भाऊ नैकोटा येथून दुचाकीवरून गंगाखेडकडे येत होते. तेव्हा गंगाखेड- परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ पलटी होऊन अपघातग्रस्त झालेल्या उसाच्या ट्रॉलीला त्यांची दुचाकी क्रमांक एमएच २६ जे ५६१९ धडकली. या अपघातात दुचाकीवरील विठ्ठल गणपत लांडगे (३२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अतुल गणपत लांडगे (२६) हे जखमी झाले ही घटना मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सपोनि बालाजी गायकवाड, सपोउपनि टी. टी. शिंदे, जमादार बाबूराव घरजाळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जखमी अतुल गणपत लांडगे यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर मयत विठ्ठल गणपत लांडगे यांच्यावर शवविच्छेदन करून २ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी नातेवाईकांनी फिर्याद न दिल्याने मंगळवार दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.