मानोलीत एकाच रात्री तीन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST2021-05-12T04:18:01+5:302021-05-12T04:18:01+5:30

मानोली येथील रुस्तुम धोंडीराम मांडे यांच्या घरात मंगळवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून ...

Three houses were blown up in one night in Manoli | मानोलीत एकाच रात्री तीन घरे फोडली

मानोलीत एकाच रात्री तीन घरे फोडली

मानोली येथील रुस्तुम धोंडीराम मांडे यांच्या घरात मंगळवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात वेश केला. खोलीतील कपाट फोडून त्यातील२० हजार रुपये चोरून नेले. त्याचप्रमाणे गावातील महादेव शेषराव शिंदे यांचे घरही चोरट्यांनी फोडले. महादेव शिंदे यांच्या घरातील सोन्याच्या दोन अंगठ्या आणि भगवान दगडूबा शिंदे यांच्या घरातील एक झुंबर व सोन्याची चैन असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. या तीनही घरातून चोरट्यांनी चोरून नेलेले इतर साहित्य मात्र गावापासून दूर अंतरावर चोरट्यांनी फेकून दिले होते. पोलीस पाटील बबन तळेकर यांनी सेलू पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी गावात येऊन पंचनामा केला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता.

Web Title: Three houses were blown up in one night in Manoli