जिंतूरमध्ये दुकानाला शॉर्टसर्किटने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:14 AM2021-06-04T04:14:59+5:302021-06-04T04:14:59+5:30

शहरातील बाजारपेठेतील व्यापारी नागरिक सय्यद रसूल सय्यद इसाख यांच्या किरायाच्या दुकानात ग्राहक सेवा केंद्र व एस.डी.युनानी औषध दुकान आहे. ...

A short circuit caused a fire in a shop in Jintur | जिंतूरमध्ये दुकानाला शॉर्टसर्किटने आग

जिंतूरमध्ये दुकानाला शॉर्टसर्किटने आग

Next

शहरातील बाजारपेठेतील व्यापारी नागरिक सय्यद रसूल सय्यद इसाख यांच्या किरायाच्या दुकानात ग्राहक सेवा केंद्र व एस.डी.युनानी औषध दुकान आहे. २ जून रोजी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता तर रात्री २ च्या सुमारास या दुकानातून धूर निघत असल्याने नागरिकांनी दुकानदारास फोनवर ही माहिती दिली. यानंतर सय्यद रसूल सय्यद इसाख यांनी दुकानाकडे धाव घेतली. न.प. अग्निशमन दलास फोन केले. परंतु, तेथील फोन लागत नसल्याने अग्निशमन कार्यालयात नागरिकांनी स्वत: जात आगीची माहिती दिली. तब्बल एक तासानंतर अग्निशमन दल दाखल झाले. पण तोपर्यंत या आगीत दुकान जाळून खाक झाले होते. या आगीत दुकानातील युनानी औषधी, ग्राहक सेवा केंद्रातील संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, लॅमिनेशन मशीन व गल्ल्यातील रोख ५० हजार रुपये असे अंदाजे ७ लाखाचा माल जळून खाक झाला. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस जमादार सुलोचना गाडेकर यांनी केला.

Web Title: A short circuit caused a fire in a shop in Jintur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.