शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! निवडणुकीसाठी नियुक्त अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 14:37 IST

पूर्णा येथील शाखा अभियंता पांडुरंग सखाराम मोरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना ५ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पूर्णा नदीच्या पुलाखाली आढळला.

ठळक मुद्दे निवडणूक कामात कर्तव्यावर असताना एका अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू होणे ही बाब खेददायक आहे. तेव्हा या प्रकाराची चौकशी करून संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी

पूर्णा (जि. परभणी) : पूर्णा ते ताडकळस या रस्त्यावरील पूर्णा नदीच्या कोरड्या पात्रात निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या पी. एम. मोरे या अभियंत्याचा मृतदेह ५ जानेवारी रोजी सायंकाळी आढळला. या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. 

पूर्णा नदीच्या कोरड्या पात्रात एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडली असल्याची माहिती पूर्णा पोलिसांना ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मिळाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरून पाहणी केली असता पूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता पी. एम. मोरे यांचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांची नेमणूक निवडणूक कामासाठी करण्यात आली आहे. मोरे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चौकशी करून खुनाचा गुन्हा नोंदवापूर्णा येथील शाखा अभियंता पांडुरंग सखाराम मोरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना ५ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पूर्णा नदीच्या पुलाखाली आढळला. निवडणूक कामात कर्तव्यावर असताना एका अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू होणे ही बाब खेददायक आहे. तेव्हा या प्रकाराची चौकशी करून संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर भडंगे, कार्याध्यक्ष संभाजी वागतकर, हरिभाऊ गुव्हाडे, सीताराम ठाकरे, बापूराव बर्गे, विजय बेले, भगीरथ मिरासे, आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूparabhaniपरभणी