कोल्हापूरचा शिवम माळकर प्रथम, तर बीडची पूनम धुके द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:16 IST2021-03-19T04:16:47+5:302021-03-19T04:16:47+5:30

सेलू : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राजस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूर येथील शिवम माळकर याने प्रथम, ...

Shivam Malkar of Kolhapur came first and Poonam Dhuke of Beed came second | कोल्हापूरचा शिवम माळकर प्रथम, तर बीडची पूनम धुके द्वितीय

कोल्हापूरचा शिवम माळकर प्रथम, तर बीडची पूनम धुके द्वितीय

सेलू : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राजस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूर येथील शिवम माळकर याने प्रथम, तर बीड येथील पूनम धुतमळ हिने द्वितीय क्रमांक पटविला.

सेलू येथील गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू हायस्कूल व पुरोगामी विचार मंच, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात आल्या. तृतीय क्रमांक पाथरी येथील अजय पाथरीकर यांनी पटकाविला, तर प्रफुल्ल तोताराम माळी (धुळे), अनुराधा सुभाष हिवाळे (नाशिक), नितीन राजू जंजाळ, सुरेश शिवाजीराव अंभोरे (सिल्लोड) यांनी उत्तेजनार्थ पारिषतोषिक पटकाविले. परीक्षक म्हणून प्रा.सुरेश हिवाळे, रवींद्र सुरवसे यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी रहीम खान पठाण, अशोक उफाडे, प्रा.शरद ठाकर, डॉ. काशीनाथ पल्लेवाड, सतीश गवारे, डॉ. विशाल जाधव, सुनील अहिरे, दिलीप बेंद्रे, गजानन निकाळजे, सुनील पारवे, आकाश नंद, ज्ञानेश्वर घाटूळ यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Shivam Malkar of Kolhapur came first and Poonam Dhuke of Beed came second