५ कोटींच्या निधीतून कोविडसाठीची साहित्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:37+5:302021-05-06T04:18:37+5:30

राज्य शासनाच्या वतीने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी एका आमदारांना मतदारसंघांत विविध विकासकामे करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी ...

Purchase of materials for Kovid from a fund of Rs. 5 crores | ५ कोटींच्या निधीतून कोविडसाठीची साहित्य खरेदी

५ कोटींच्या निधीतून कोविडसाठीची साहित्य खरेदी

googlenewsNext

राज्य शासनाच्या वतीने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी एका आमदारांना मतदारसंघांत विविध विकासकामे करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. गेल्यावर्षीपासून राज्यावर कोरोनाचे संकट आल्याने आमदार निधी कोरेाना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. यावर्षीही असाच निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी २३ एप्रिलला वितरित करण्याचे आदेश नियोजन विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत. त्यानुसार आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, आ. मेघना बोर्डीकर, आ. बाबाजानी दुर्राणी आणि आ. रत्नाकर गुट्टे या पाच आमदारांना प्रत्येकी १ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या निधीतून आता कोविड उपाययोजनांसाठी लागणारी यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार आमदारांना या निधीमधून शासकीय आरोग्य संस्थांसाठी ऑक्सिजन कान्सट्रेंटर्स, ऑक्सिजन सिलिंडर, रेग्युलेटर्स, हॉस्पिटल बेडस्, आयसीयू बेड्स, व्हायटलसाईन मॉनिटर्स, एनआयसीयू व्हेंटिलेटर्स, बायपॅप मशीन्स, स्ट्रेचर्स, पेशेंट ट्रॉलीज, इमर्जन्सी ट्रॉलीज, फार्मासिटीकल फ्रीजेस, व्हॅक्सिन बॉक्सेस, कोरोना प्रतिबंधात्मक औषधी व यंत्रसामग्री आदी साहित्य खरेदी करण्याचे सूचित करण्यात आले होते. याशिवाय आता ५ मे रोजी नियोजन विभागाने काढलेल्या आदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट व ऑक्सिजन साठवणूक टँक खरेदी करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये येत्या काही दिवसांत आमदार निधीतून हे साहित्य उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: Purchase of materials for Kovid from a fund of Rs. 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.