शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खुनातील तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:41 IST

तालुक्यातील बोबडे टाकळी येथे एकाचा धारदार शस्त्राने खून केल्या प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे येथून जेरबंद केले़ या तिन्ही आरोपींना गुरुवारी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील बोबडे टाकळी येथे एकाचा धारदार शस्त्राने खून केल्या प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे येथून जेरबंद केले़ या तिन्ही आरोपींना गुरुवारी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़याबाबत सविस्तर माहिती अशी, परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे येथील ज्ञानोबा आस्वार यांचा ८ नोव्हेंबर रोजी धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता़ या प्रकरणी मयताची पत्नी रंजना ज्ञानोबा आस्वार हिने दिलेल्या फिर्यादीवरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांचे पथक आरोपीच्या शोधार्थ मुंबई, पुणे येथे रवाना झाले़ या बाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील जोगेश्वरी व पुण्यातील आळंदी येथून मयताचा सावत्र भाऊ अमोल बापूराव आस्वार (२४, रा़ बोबडे टाकळी), नितीन किशन घायाळ (२६, रा़ केंदळी ता़ मंठा), बालासाहेब सखाराम माळवदे (३२, रा़ दिग्रस खु़ ता़ सेलू) या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले़ त्यानंतर या तिन्ही आरोपींना १४ नोव्हेंबर रोजी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़तोंडाला चिकटपट्टी लावून केले वार४या प्रकरणात देण्यात आलेल्या फिर्यादीत, आरोपींनी ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री फिर्यादी रंजना आस्वार यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर त्यांचा पती ज्ञानोबा आस्वार यांना बाहेर ओढत नेवून धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केले़४तसेच त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले होते़ त्यामुळे हा खून कोणत्या उद्देशाने करण्यात आला? याचा तपास आता पोलीस करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीMurderखून