शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अभियानांतर्गत स्वच्छतेच्या कामांना दिली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:34 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छता कामगार आणि खाजगी विनिदाधारक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छता कामगार आणि खाजगी विनिदाधारक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे.महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी या मोहिमेची सुरुवात करण्यापूर्वी स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्य रस्त्यावरील कचºयाची सफाई करा, रस्त्यावर पडलेले दगड, विटा उचलून बाजूला टाका, नाल्यांच्या सफाईचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गांधी पार्क, शिवाजी चौक या भागात गर्दी आणि अतिक्रमणामुळे महिलांना तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील इतर भागातही स्वच्छतेची कामे हाती घ्यावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या होत्या. या बैठकीनंतर शहरातील स्वच्छता कामगारांच्या हाताखाली २० ते २५ कर्मचारी आणि एका मुकादमाची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारपासून प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. वसमतरोड, जिंतूररोड आदी भागातील वसाहतीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच नाल्यांची सफाई केली जात आहे. गंगाखेड रोड, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर इ. ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.डास निर्मूलनासाठी धूर फवारणी४स्वच्छते बरोबरच शहरात तापीची साथ पसरल्याने डास निर्मूलनासाठीही महापालिकेने धूर फवारणी सुरु केली आहे. नागरिकांनी घरातील रांजण, साठविलेले पाणी झाकून ठेवावे, भंगार विक्रेत्यांनी टायर, जुन्या वस्तूंमध्ये पाणी साचले असल्यास ते रिकामे करावेत. शाळा महाविद्यालयातील शौचालयांना परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.मोकाट जनावरांसाठी काढल्या निविदा४शहरात स्वच्छता मोहीम सुरु करण्याबरोबरच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वसमत रोड आणि जिंतूर रोड या भागांत मोकाट जनावरांची संख्या मोठी असल्याने या जनावरांना पकडून गो शाळेत टाकण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जाईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका