शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:13 IST

गोदावरी पात्रातील तारुगव्हाण येथील उच्च पातळीतील बंधाºयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंधाºयाला १७ गेट बसविण्यात आले आहेत. उर्वरित काम सुरु असून मार्च अखेरपर्यंत या बंधाºयात पाणी अडविण्याची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती बंधारा प्रशासनाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): गोदावरी पात्रातील तारुगव्हाण येथील उच्च पातळीतील बंधाºयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंधाºयाला १७ गेट बसविण्यात आले आहेत. उर्वरित काम सुरु असून मार्च अखेरपर्यंत या बंधाºयात पाणी अडविण्याची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती बंधारा प्रशासनाने दिली.राज्य शासनाने पैठण ते बाभळीपर्यंत उच्च पातळीचे साखळी पद्धतीने बंधारे बांधण्याची मोहीम २००५ मध्ये हाती घेतली होती. याच प्रकल्पांतर्गत पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुद्गल या ठिकाणी दोन बंधारे मंजूर करण्यात आले होते. मात्र दोन्ही बंधाºयाच्या आतमध्ये गोदावरीच्या पात्रात जास्तीचे अंतर असल्याने काही गावे पाण्याच्या लाभापासून वंचित राहू लागली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता शासनाने तारुगव्हाण येथे बंधारा बांधण्यास मंजुरी दिली; परंतु, कंत्राटदाराच्या व पाटबंधारे विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे या बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे मागील १३ वर्षात या बंधाºयाचे काम संथगतीने करण्यात आले. त्यामुळे या बंधाºयातील पाण्याचा लाभ मिळेल की नाही, अशी शंका शेतकºयांमध्ये होती. त्यातच मागील वर्षापासून या बंधाºयाच्या कामाने गती घेतली होती. त्यामुळे बंधाºयाचे काम पूर्ण होऊन आॅक्टोबर २०१९ अखेर पावसाचे पाणी बंधाºयात अडविले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाळ्याच्या काळामध्ये बंधाºयाचे काम पूर्ण झाले नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये बंधाºयाच्या कामाला सुरुवात झाली. मागील महिनाभरापूर्वी बंधाºयाला १७ गेट बसविण्यात आले आहेत. गेटची चाचणी व इतर कामे सुरु आहेत. मार्च अखेर बंधाºयाचे सर्व काम पूर्ण होऊन या बंधाºयात पाणी साठवण्याची चाचणी केली जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता एस.एस. हाके यांनी दिली.२१०० हेक्टर क्षेत्रावर सिंचन अपेक्षितमुद्गल आणि ढालेगाव बंधाºयात यापूर्वीच पाणी अडविले गेले आहे. तारुगव्हाण बंधाºयाचे काम १३ वर्षापासून रखडले होते. या बंधाºयाची पाणी साठवण क्षमता ही १५.४६ दलघमी एवढी आहे. त्यामुळे मुद्गल आणि ढालेगाव या दोन बंधाºयापेक्षा तारुगव्हाण बंधाºयातील पाणी साठवण क्षमता अधिक आहे. या बंधाºयाच्या कार्यक्षेत्रात पाथरी आणि माजलगाव कार्यक्षेत्रातील १६ गावे येतात. त्यामुळे २१०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीGovernmentसरकार