शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

परभणी: भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:40 AM

जिंतूर तालुक्यातील हंडी येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आ.विजय भांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील हंडी येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आ.विजय भांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.जिंतूर विधानसभा मतदारसंघात आ.विजय भांबळे यांच्याकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी हंडी येथील भाजपाचे कार्यकर्ते भगवान पालवे, विठ्ठल पालवे, विष्णू डोईफोडे, गणेश डोईफोडे, अशोक कांगणे, राजेश घुगे, गणेश मुंडे, भगवान घुगे, भगवान कांगणे, राजू नागरे, गजानन डोईफोडे, अमोल राठोड, बाळू डोईफोडे आदींनी आ.भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना हंडी येथे कुठलीही विकासकामे होत नाहीत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून कच्च्या रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. तसेच सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरुन पाणी वाहते. शिवाय गावात पथदिवेही नाहीत. या बाबीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना आ.भांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी पिंटू घुगे, पंढरी घुगे, रामप्रसाद घुगे, सोपान डोईफोडे, पांडुरंग डोईफोडे, सोपान कांगणे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस