शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत एटीएसने पकडला बारा लाखांचा चोरीचा माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:54 IST

दहशतवादविरोधी पथकाने ७ डिसेंबर रोजी रात्री एका ट्रकमधून माल जप्त केला

ठळक मुद्देतीन टन तांब्याच्या पट्ट्या जप्त  नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परभणी  : येथील दहशतवादविरोधी पथकाने ७ डिसेंबर रोजी रात्री एका ट्रकमधून १२ लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी  नानलपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ खोले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ७ डिसेंबर रोजी भंगार विक्रेत्यांची चौकशी केली. त्यावेळी खंडोबा बाजारातील अहिल्याबाई होळकर चौकात न्यू बॉम्बे स्क्रॅप या दुकानात एका ट्रकमध्ये (एपी १२/यु ०५८६) तांब्याचे बंडल टाकले जात असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या मालाविषयी चौकशी केली असता, तो चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी तीन टन तांब्याच्या पट्ट्या जप्त केल्या आहेत. 

या तांब्याची किंमत १२ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार भारत नलावडे यांच्या फिर्यादीवरुन  शेख अजमत अली शेख मजहर अली (३८, जिजामाता रोड, परभणी) आणि ट्रक चालक गणेश नारायण मिरासे (४५, रा.शिरडशहापूर ता.औंढा, जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार राजेश्वर पाटील तपास करीत आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विश्वास कोल्हे, भारत नलावडे, दत्तात्रय चिंचाणे, अजहर पटेल, दीपक मुदिराज, सुधीर काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :PoliceपोलिसparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी