तालुक्यातील हादगाव पावडे शिवारात प्रस्तावित एम.आय.डी.सी. उभारणीसाठी संपादित करावयाच्या जमिनीचे दर निश्चित होत नसल्याने एम.आय.डी.सी. उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे. ...
किरायाणे चालविण्यासाठी दिलेल्या जेसीबी मशीनची परस्पर विक्री केल्या प्रकरणी ३१ डिसेंबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा पोलीस दलातील शिस्त बिघडली असून काही कर्मचाºयांकडून विशिष्ट कामांचा आग्रह धरला जात असताना वरिष्ठांचाही सन्मान ठेवला जात नाही, अशी तक्रार पोलीस दलातीलच एका कर्मचाºयाने ‘लोकमत’कडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने तलाठी राजू ऊर्फ लक्ष्मीकांत काजे यांना उपविभागीय अधिकारी डॉ.सूचिता शिंदे यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश परभणी तहसील कार्यालयास सोमवारी निर्गमित करण्यात आला. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पाथरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी ५०० कर्जप्रस्ताव बँकेकडे सादर केले आहेत; परंतु, अद्यापपर्यंत बँकांकडून एकही प्रस्ताव निकाली काढण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये बँक प्रशा ...
राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या वाहनाद्वारे प्रवास करणाऱ्या विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना सवलत देण्याचे आदेश आॅक्टोबर महिन्यात काढले असले तरी परभणीतील एसटी महामंडळात मात्र अद्यापपर्यंत हे आदेश पोहोचले नाहीत़ आदेशानुसार अंमलबजावणी होत नसल्याने हजारो ...
परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...