दुकानदारांवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:25+5:302021-05-07T04:18:25+5:30

परभणी शहरात संचारबंदी लागू असताना प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक दुकानदार दुकाने उघडत असल्याचा प्रकार सातत्याने पाहावयास मिळत आहे. ...

Notice to the employee taking action against the shopkeeper | दुकानदारांवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यास नोटीस

दुकानदारांवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यास नोटीस

Next

परभणी शहरात संचारबंदी लागू असताना प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक दुकानदार दुकाने उघडत असल्याचा प्रकार सातत्याने पाहावयास मिळत आहे. याच अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने गेले तीन दिवस विविध ठिकाणी दंडात्मक कारवाई केली होती. या अनुषंगाने मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांचे साहाय्यक बनसोडे यांनी सदरील दुकानदारांना दंड किती आकारावा याची नियमावली नसताना मनमानी करून जास्त रकमेची मागणी केली व कमी रकमेची पावती दिली, अशी तक्रार महापालिकेतील सभागृह नेते सय्यद समी सय्यद साहेबजान यांनी उपायुक्त प्रदीप जगताप यांच्याकडे केली. या संदर्भातील तक्रार अर्जात बनसोडे यांना कार्यालयाकडून शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यादेश दिला आहे का? दंडाच्या पावतीवर बनसोडे यांना सही करण्याचा अधिकार आहे का? एकाच दुकानदाराकडे दोन-दोन वेळेस जाऊन त्यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. याची चौकशी करून रकमेची मागणी केल्याप्रकरणी बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल का? करण्यात येऊ नये ? असेही दिलेल्या तक्रार अर्जात सय्यद समी यांनी नमूद केले आहे. ६ एप्रिल रोजी हा तक्रार अर्ज दिल्यानंतर उपायुक्त जगताप यांनी गतिमानता दाखवत याच दिवशी बनसोडे यांना नोटीस बजावली आहे. त्यात ७ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून म्हणणे सादर करण्याचे आदेश जगताप यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणी मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनाही ७ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून अहवाल सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Notice to the employee taking action against the shopkeeper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.