बीडी ओढण्यास मनाई; सुरक्षा रक्षकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST2021-03-22T04:16:10+5:302021-03-22T04:16:10+5:30

गंगाखेड : येथील उपजिल्हा रुग्णलायात बीडी ओढण्यास मनाई केल्याच्या कारणावरून दोघांनी रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २१ ...

No smoking; Beating a security guard | बीडी ओढण्यास मनाई; सुरक्षा रक्षकास मारहाण

बीडी ओढण्यास मनाई; सुरक्षा रक्षकास मारहाण

गंगाखेड : येथील उपजिल्हा रुग्णलायात बीडी ओढण्यास मनाई केल्याच्या कारणावरून दोघांनी रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २१ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आलेल्या दोन इसमांनी दवाखाना सुरू आहे का? असे सुरक्षारक्षक सतीश केशवराव गव्हाणे यांना विचारले. तेव्हा दवाखाना चालू आहे, असे सुरक्षारक्षकांनी म्हटले. त्यानंतर दोघेही दवाखान्यात गेले. त्यानंतर बाहेर आल्यानंतर एकाने बीडी ओढण्यास सुरुवात केली. काका, येथे बीडी ओढू नका, असे म्हणताच सतीश गव्हाणे यांना शिवीगाळ करत थापडबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सुरक्षारक्षक सतीश गव्हाण यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात संभाजी किशन खोडवे व जयसिंग संभाजी खोडवे (दोघे रा. पेठ पिंपळगाव, ता. पालम) या पिता - पुत्रांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: No smoking; Beating a security guard