शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दुचाकीच्या हँडलला लटकवलेली व्यापाऱ्याची अडीच लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 6:17 PM

अल्पवयीन मुलाने बुलेटला असलेली बॅग पळविल्याचे सीसीटीव्हीत कैद

गंगाखेड: आडत दुकान उघडण्यासाठी जात असलेल्या व्यापाऱ्याची अडीच लाख रुपयांची बॅग एका अल्पवयीन चोरट्यांने पळविल्याची घटना सोमवारी (दि. ९ ) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील मोंढा परिसरात भरदिवसा झालेल्या या चोरीने व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आडत व्यापारी रंगनाथ रामराव जाधव हे सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मोंढा परिसरातील  आडत दुकाना उघडण्यासाठी दुचाकीवर ( क्रमांक एम एच २२ ए क्यू ५१५१ ) जात होते. दरम्यान मोंढा कॉर्नरवर एका पान टपरी समोर जाधव यांनी दुचाकी उभी केली. येथे काही परिचितांसोबत जाधव बोलण्यात दंग होते, याचाच फायदा घेत एका अल्पवयीन चोरट्याने दुचाकीच्या हँडलला लावलेली पैशाची बॅग काही क्षणातच लंपास केली. अवघ्या काही क्षणातच बुलेटवरील बॅग लंपास झाल्याने जाधव भांबावून गेले. आरडा ओरडा करून त्यांनी बॅगेचा शोध घेतला. मात्र, चोरटे आणि बॅग आढळून आले नाहीत.

या घटनेबद्दल रंगनाथ जाधव यांनी तातडीने बॅग चोरीस गेल्याची व बॅग पळविणाऱ्या चोरट्यांची माहिती दिली. यानंतर जमादार रंगनाथ देवकर, पोलीस शिपाई एकनाथ आळसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मोंढा कॉर्नरवर असलेल्या एका कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेंव्हा अल्पवयीन मुलाने बुलेटला असलेली बॅग पळविल्याचे दिसून आले. दर सोमवार व शनिवार या आठवडी बाजाराच्या दिवशी किमती मोबाईल, दुचाकी वाहने आदी पळविणाऱ्या चोरट्यांनी आता भरदिवसा मुख्य बाजार पेठेतुन व्यापाऱ्यांची बॅगा लंपास केल्याच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. 

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी