शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

'पाणी सोडा, पिके करपत आहेत'; शेतकऱ्यांचे जायकवाडीच्या कालव्यात जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:07 IST

पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला.

- विठ्ठल भिसेपाथरी: चारी क्र 49 मधून पाणी सोडण्याची मागणी करत तालुक्यातील हादगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आज दुपारी वरखेड येथील जायकवाडीच्या डाव्या कालव्यामध्ये उतरत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असल्याने शेतकऱ्यांचा संताप होत आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला.

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांना दोन पाणी आवर्तन मंजूर करण्यात आले आहेत. पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडण्यात आले होते. तर दुसरे आवर्तन आठ दिवसापासून सोडण्यात आले आहे. असे असले तरी हदगाव बु येथील चारी क्रमांक 49 ला  अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. या चारीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.  कालवा निरीक्षक यांनी पाणी सोडतो पाणीपट्टी भरून घ्या , म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली. मात्र, जायकवाडीचे पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. यातच खताचा डोस दिल्याने पिके करपत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. 

यामुळे आज सकाळी आठ वाजेपासून वरखेड जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालया शेजारील डाव्या कालव्यामध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत चारी क्रमांक 49 ला पाणी सोडले जात नाही तोपर्यंत बाहेर येणार नसल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. दरम्यान, उप विभागीय अभियंता पवार घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.

पूर्णक्षमतेने पाणी सोडावेपैठणच्या जायकवाडी धरणा मधून रब्बी हंगामासाठी पाण्याचे दुसरे आणि शेवटचे आवर्तन सोडले गेलेले असून बी 59 वितरेकेला पूर्ण क्षमतेने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे .रब्बीतील उशिरा  पेरणी केलेल्या पिकांना पाण्याची आवश्यक असताना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टेल पर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही .त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी बी 59 चारीमध्ये सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र