चोरट्यांनी चोरलेले दागिने पोलिसांनी केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:31+5:302021-02-24T04:18:31+5:30

आरखेड येथे अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने व इतर माल चोरून नेला. याप्रकरणी पालम पोलीस ...

The jewelry stolen by the thieves was returned by the police | चोरट्यांनी चोरलेले दागिने पोलिसांनी केले परत

चोरट्यांनी चोरलेले दागिने पोलिसांनी केले परत

आरखेड येथे अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने व इतर माल चोरून नेला. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेऊन त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. हे दागिने फिर्यादी गोविंद गणेश चडावेकर, रा. आरखेड, ता. पालम, जि. परभणी यांना २२ फेब्रुवारी रोजी परभणी येथे नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक जयंत मीना, सुदर्शन मुंमका, सुभाष राठोड यांची उपस्थिती होती. या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सचिन इंगळे, विनोद साने, बलभीम पोले, गोविंद सुगावकर आदी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

Web Title: The jewelry stolen by the thieves was returned by the police