शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे शेती धोरण जपणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST

परभणी : शेती आणि शेतकरी हित शिवरायांना सर्वोच्च होते. कित्येक वेळा अत्यंत कठीण परिस्थिती उद्‌भवली; मात्र अशा परिस्थितीतही ...

परभणी : शेती आणि शेतकरी हित शिवरायांना सर्वोच्च होते. कित्येक वेळा अत्यंत कठीण परिस्थिती उद्‌भवली; मात्र अशा परिस्थितीतही शिवरायांनी शेतकरी हित जपले. त्यांचे शेती धोरण आजही जपणे गरजेचे आहे, असे मत मंचक दुधाटे यांनी व्यक्त केले.

येथील पाणी, वीज बचत गटाच्यावतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात दुधाटे बोलत होते. यावेळी रणजित कारेगावकर, प्रा.डॉ.जयंत बोबडे, पत्रकार पंकज क्षीरसागर, बंडू मगर, शेख सलाम, प्रसाद ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. दुधाटे म्हणाले की, स्वराज्य हे आपले आहे आणि ते स्वतंत्रही आहे, ही जाणीव करून देत त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्थानिक भूमिपुत्रांना सैनिक म्हणून सामावून घेतले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून लढण्याची स्फूर्ती दिली. शेतीला व शेतकऱ्यांना राजांनी विशेष संरक्षण दिले, असे त्यांनी सांगितले. रणजित कारेगावकर यांनी सूत्रसंचालन केेले. विष्णू मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केेले. रघुनाथ शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक चांदणे, बाळासाहेब सिनगारे, संजय देसाई, संदीप खरडे, भीमा मोरे, दीपक फाटे, शेख मोहसीन, नितीन जवंजाळ, शेख रिहान, राजेश महामुने, दीपक घाटुळ, शेख अब्दुल, विशाल शिंदे, रोहीत पाटील, शेख खदीर, संजय अग्रवाल आदींनी प्रयत्न केले.