महिलेच्या घरातून जप्त केला ४७ हजारांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 17:54 IST2021-05-12T17:53:53+5:302021-05-12T17:54:10+5:30

राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी असतानाही जिल्ह्यात मात्र गुटख्याची सर्रास विक्री होत आहे.

Gutkha worth Rs 47,000 seized from woman's house | महिलेच्या घरातून जप्त केला ४७ हजारांचा गुटखा

महिलेच्या घरातून जप्त केला ४७ हजारांचा गुटखा

परभणी : शहरातील रमाबाईनगर भागात एका महिलेच्या घरातून पोलिसांनी ४७ हजार २५० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी असतानाही जिल्ह्यात मात्र गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. शहरातील रमाबाईनगर येथे एका महिलेच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिसांनी या महिलेच्या घरातील दुकानावर छापा टाकला. तेव्हा गुटखा, जर्दा व सुगंधित पानमसाला असा एकूण ४७ हजार २५० रुपयांचा साठा मिळून आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण राजाराम धुमाळ यांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Gutkha worth Rs 47,000 seized from woman's house