परभणीच्या बाबर कॉलनीत पकडला दोन लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 14:38 IST2021-06-02T14:38:53+5:302021-06-02T14:38:53+5:30

या कारवाईत गुटख्यासह ४ लाख रुपयांची गाडी असा ५ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Gutkha worth Rs 2 lakh seized in Babar Colony, Parbhani | परभणीच्या बाबर कॉलनीत पकडला दोन लाखांचा गुटखा

परभणीच्या बाबर कॉलनीत पकडला दोन लाखांचा गुटखा

परभणी : शहरातील बाबर कॉलनी भागात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून एका स्कार्पिओ गाडीतून १ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, कर्मचारी दीपक मुंडे, जाकीर सय्यद, बंकट लटपटे, भागवत हुंडेकर, अनिल इंगळे, कपिल घोडके आदींनी मिळालेल्या माहितीच्या आधारे १ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाबर कॉलनी परिसरात छापा टाकला. यावेळी एम एच २२/डी १४१४ या क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीमध्ये पोलिसांना अवैधरीत्या गुटखा साठवलेल्या आढळून आला. जप्त केल्याच्या केलेल्या गुटख्याची मोजदाद केली. तेव्हा १ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा गुटखा आढळला. 

या कारवाईत गुटख्यासह ४ लाख रुपयांची गाडी असा ५ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी उमाकांत सुशे यांच्या फिर्यादीवरून आरोपी माणिक हरिभाऊ बाराखुदे, गजानन बालासाहेब बाराखुदे (दोघे रा. आंबेटाकळी ता. जि.परभणी) आणि परळी येथील शेख नावाचा एक आरोपी अशा तिघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक तुरनर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Gutkha worth Rs 2 lakh seized in Babar Colony, Parbhani