जिल्हा कचेरीत वाहनांचा गराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST2020-12-29T04:15:00+5:302020-12-29T04:15:00+5:30

स्टेडियम परिसरात रस्त्याचे काम अर्धवट परभणी : येथील जिल्हा स्टेडियम भागात सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम ...

Garada of vehicles at the district office | जिल्हा कचेरीत वाहनांचा गराडा

जिल्हा कचेरीत वाहनांचा गराडा

स्टेडियम परिसरात रस्त्याचे काम अर्धवट

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम भागात सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम अर्धवट अवस्थेत ठेवले आहे. नाल्यांवर स्लॅब टाकण्याचे काम अद्यापही पूर्ण केले नाही. त्यामुळे या भागातील नाल्या धोकादायक झाल्या आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही हे काम पूर्ण केले जात नसल्याने नागरिकांसाठी धोका कायम आहे.

शहरी भागातही विजेचा लपंडाव सुरूच

परभणी : ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही विजेचा लपंडाव सुरू आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर तो लवकरच सुरळीत होत नाही. दोन दिवसांपूर्वी तर कमी दाबाने वीजपुरवठा करण्यात आला. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळण्याची भीती निर्माण झाली आहे. बाजारपेठ भागातही दिवसभरातून विजेचा लपंडाव सुरूच राहतो. परिणामी व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. वीज वितरण कंपनीने शहरी भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Garada of vehicles at the district office