फेसबुकवर अश्लील फोटो टाकणारा गजआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:00+5:302020-12-27T04:13:00+5:30

ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव अनिल गुरसळी (रा.बीड) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने महिलेचे अश्लील फोटो फेसबुकवर वेगवेगळ्या ...

Gajaad who posted obscene photos on Facebook | फेसबुकवर अश्लील फोटो टाकणारा गजआड

फेसबुकवर अश्लील फोटो टाकणारा गजआड

ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव अनिल गुरसळी (रा.बीड) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने महिलेचे अश्लील फोटो फेसबुकवर वेगवेगळ्या अकाऊंटवरून प्रसारित करून बदनामी केली होती. त्या अनुषंगाने नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक जी. टी. बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून बीड येथून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संतोष व्यवहारे व गणेश कौटकर यांनी सतत पाठपुरावा केला. आरोपीस नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार सुलक्षण शिंदे, अर्जुन टाक, अनिल हत्तीअंबिरे यांच्याकडे पुढील तपासासाठी सुपूर्द केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Gajaad who posted obscene photos on Facebook