शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 15:17 IST

the fire case of the district hospital Parabhani जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणि याच परिसरातील धोबीघाट येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देधोबी घाटाच्या पाठीमागील बाजूस कचरा जमा करून त्यास आग लावण्यात आली. त्यानंतरही आगीचे निखारे खिडकीतून टाकले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन ठिकाणी लागलेल्या आगीच्या प्रकरणात नानलपेठ पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणि याच परिसरातील धोबीघाट येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणात जीवित हानी झाली नसली तरी घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी दीपक मोहोळकर यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे रविवारी रात्री उशिरा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रकाश डाके यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जी.टी. बाचेवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आग लावल्याचा संशयधोबीघाट भागात लागलेल्या आगीत साधारणतः २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. धोबी घाटाच्या पाठीमागील बाजूस कचरा जमा करून त्यास आग लावण्यात आली. त्यानंतरही आगीचे निखारे खिडकीतून टाकले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगCrime Newsगुन्हेगारी