शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; २५३५ ज्येष्ठांना समोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST

जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत शहरातील शनिवार बाजार परिसरात नेत्र रुग्णालय आहे. मोतीबिंदू निर्मूलन या राष्ट्रीय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या ...

जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत शहरातील शनिवार बाजार परिसरात नेत्र रुग्णालय आहे. मोतीबिंदू निर्मूलन या राष्ट्रीय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या शस्त्रक्रिया याठिकाणी होतात. खासगी रुग्णालयांमध्ये अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठीही मोठी रक्कम मोजावी लागते. २५ हजारांपासून ते लाखापर्यंतची ही रक्कम जाते. हा खर्च परवडत नसल्यामुळे अनेकदा सामान्य रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतात. याठिकाणी राष्ट्रीय योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. तेथे शहर व ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतात. दररोज सुमारे १० ते २० जणांची शस्त्रक्रिया याठिकाणी होते. मागील वर्षी जिल्ह्यातील तब्बल २ हजार ५३५ नागरिकांवर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेली ही सुविधा मार्च महिन्यापासून बंद पडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद असल्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर झाला. त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ५३५ ज्येष्ठांसमोर अंधार निर्माण झाला आहे. त्यामुळे नेत्र रुग्णालयात तातडीने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलणे आवश्‍यक आहे.

नेत्र विभाग प्रमुखाचा कोट

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांचा आदेश मिळताच या नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत.

-किशन नाईक, नेत्र विभागप्रमुख, परभणी

अंधार कधी दूर होणार

‘मागील तीन महिन्यांपासून एका डोळ्याने दिसत नाही. त्यामुळे परभणी येथील शासकीय दवाखान्यातील नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर हे नेत्र रुग्णालय बंद झाल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सध्यातरी माझ्यासमोर अंधार निर्माण झाला आहे.

-मुंजाजी जुंबडे

-

‘महिनाभरापासून दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी दवाखान्यात २५ हजारांहून अधिक रुपये खर्च येतो. शासकीय दवाखान्यात या शस्त्रक्रिया करणे सोयीचे आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे शस्त्रक्रियागृह बंद झाल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

-कलावंतीबाई बनसोडे

गेल्या वर्षभरातील नेत्र शस्त्रक्रिया

२५३५

कोरोनाआधी महिन्याला होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया

५६९