खळबळजनक ! भर बाजारपेठेत युवकावर धारदार शस्त्राने वार करत आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 05:15 PM2021-07-31T17:15:03+5:302021-07-31T17:16:05+5:30

दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला.

Exciting! Accused fled after attacking a youth with a sharp weapon in Bhar Bazaar | खळबळजनक ! भर बाजारपेठेत युवकावर धारदार शस्त्राने वार करत आरोपी फरार

खळबळजनक ! भर बाजारपेठेत युवकावर धारदार शस्त्राने वार करत आरोपी फरार

Next

गंगाखेड (परभणी ) : दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने भर बाजारपेठेत युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना शनिवारी ( दि.३१ ) दुपारी १:३० वाजेच्या दरम्यान गजबजलेल्या डाॅक्टर लाइन रोडवर घडली. विशाल प्रकाश कदम ( २५ ) असे जखमी युवकाचे नाव असून हल्ल्यात मानेवर व कानावर खोलवर वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

हटकर गल्लीतला रहिवासी असलेला विशाल प्रकाश कदम आज दुपारी दीड वाजेच्या दरम्यान शहरातील सर्वात वर्दळीचा भाग असलेल्या साई नगर येथिल डाॅक्टर लेन येथून जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने अचानक विशालवर धारदार शस्त्राने हल्ला केला. विशालच्या मानेवर व कानावर सपासप वार करत हल्लेखोर फरार झाला. 

गंभीर जखमी विशालला नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  खोलवर वार असल्याने रक्तस्त्राव अधिक होत असल्याने प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई शासकिय रवाना केला. यानंतर अधिक उपचारासाठी त्याला नांदेड येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक वसुधरा बोरगावकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी एकास ताब्यात घेतले आल्याची माहिती आहे. दिवसाढवळ्या भर बाजारपेठेत युवकावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

Web Title: Exciting! Accused fled after attacking a youth with a sharp weapon in Bhar Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.