वेळेवर बस येत नसल्याने टाकळी पाटीवर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:37 PM2019-09-04T14:37:43+5:302019-09-04T14:41:13+5:30

बस नसल्याने विद्यार्थ्यांचे होते शैक्षणिक नुकसान

Due to lack of timely buses, students' rastaroko on Parabhani route | वेळेवर बस येत नसल्याने टाकळी पाटीवर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको 

वेळेवर बस येत नसल्याने टाकळी पाटीवर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको 

Next
ठळक मुद्देसेलू - परभणी मार्ग बंद ४० मिनिटे वाहतूक ठप्प

सेलू :-  शाळा व महाविद्यालयात सेलू येथे जाण्यासाठी वेळेवर बस येत नसल्याने संतप्त झालेल्या निपाणी  टाकळी येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी १०. ३० च्या सुमारास अचानक रास्ता रोको आंदोलन केल्याने परभणी - सेलू या मार्गावरील वाहतूक ४० मिनिटे ठप्प झाली होती.

निपाणी टाकळी येथील सुमारे १२० विद्यार्थी शिक्षणासाठी सेलू येथे विविध शाळा आणि महाविद्यालयात ये- जा करतात. परंतु अनेक दिवसांपासून टाकळी पाटीवर शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी वेळेवर बस लागत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा तसेच  महाविद्यालयात  पोहचता येत नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  यामुळे संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सेलू  - परभणी मार्गावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांना  समजून सांगितले.  त्यानंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू झाली.

Web Title: Due to lack of timely buses, students' rastaroko on Parabhani route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.