शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर दोडक्याची शेती ठरतेय लाभदायी; दररोज मिळतेय भरघोस उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:14 IST

दोडका शेतीत आंतर पिके घेऊन उत्पन्नात आणखी वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोगआंतर पिकांतूनही उत्पन्न

परभणी : सोनपेठ तालुक्यातील शिरसी येथील प्रल्हाद शेषराव फले या शेतकऱ्यांने शेतीमध्ये वेगळे प्रयोग करीत वर्षभर दोडक्याची लागवड केली आहे. यातून ते दररोज उत्पन्न घेत असून त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये नुकसान होण्याचे प्रकार दरवर्षी होत आहेत; मात्र शेतीत थोडे वेगळे प्रयोग केले तर निश्चित असे उत्पन्न मिळू शकते हे प्रल्हाद शेषराव फले यांनी दाखवून दिले आहे. प्रल्हाद फले यांना शिर्शी परिसरात १५० एकर शेती आहे. शेतीत आवड असल्याने प्रल्हाद फले सातत्याने नवनवीन प्रयोग करतात. दोडका लागवडीचा त्यांचा प्रयोग शेतकऱ्यांना चालना देणारा आहे.  अडीच एकर शेतीत ड्रीपच्या साह्याने त्यांनी दोडक्याची लागवड केली आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर, जानेवारी ते एप्रिल आणि मे ते ऑगस्ट असे एका वर्षात तीन वेळा दोडक्याचे उत्पन्न घेतले जाते. उत्पादित दोडका परभणी, गंगाखेड आणि परळी येथील बाजारपेठेत विक्री केला जातो. यात प्रत्येक हंगामात सुमारे साडेआठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पारंपरिक पिकात उत्पन्नासाठी चार महिने प्रतीक्षा करण्यापेक्षा दररोज उत्पन्न देणारी ही शेती फायद्याची असल्याचे फले यांनी सांगितले.

आंतर पिकांतूनही उत्पन्नदोडका शेतीत आंतर पिके घेऊन उत्पन्नात आणखी वाढ करण्यात आली आहे. दोडका शेतीत मिरची, पत्ता कोबी, बेडवर मेथी, कोथंबीर ही पिके घेण्यात आली. त्यामुळे जवळच्या बाजारपेठेत या भाजीपाल्याची विक्री करून उत्पन्नात भर घालता येते.

मेहनत घ्यावी लागतेदोडक्याची शेती निश्चितच फायद्याची ठरते. मात्र यात मेहनत भरपूर घ्यावी लागते. संपुर्ण पिकासाठी ड्रीप केले आहे. तीन ते चार दिवसाआड फवारणी, दोन दिवसाआड खत द्यावे लागते,असे फले यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती