कृषीच्या विद्यार्थ्यांचे आळंबीचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:47+5:302021-05-08T04:17:47+5:30

यावेळी वनस्पती विकृती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. टी. आपेट, प्राचार्य एस. बी. जैस्वाल, प्रा. जी. व्ही. भोसले, प्रा. ...

Demonstration of agriculture students | कृषीच्या विद्यार्थ्यांचे आळंबीचे प्रात्यक्षिक

कृषीच्या विद्यार्थ्यांचे आळंबीचे प्रात्यक्षिक

यावेळी वनस्पती विकृती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. टी. आपेट, प्राचार्य एस. बी. जैस्वाल, प्रा. जी. व्ही. भोसले, प्रा. जे. डी. कळंबे, ए. ए. आवचार, आर. बी. पाटील यांची उपस्थिती होती. आळंबी हे पीक बुरशीवर्गीय प्रजाती असून याचे उत्पादन उष्ण कटिबंधीय भागात घेतले जाते. जिल्ह्यातील हवामान धिंगरी आळंबीसाठी वर्षभर अनुकूल आहे. आळंबीसाठी २० ते ३० अंश तापमान व ६५ ते ९० टक्के आर्द्रतेची आवश्यकता आहे. आळंबी उत्पादनासाठी शेतातील पिकांचे अवशेष व भुसा, भात, गहू, सोयाबीन, ज्वारी या घटकांना वापर करण्यात येतो. ही प्रजाती शिंपल्याच्या आकाराची असल्याने त्याला मागणी आहे. काळंबीमध्ये प्रथिने, तंतूमय पदार्थ, कार्बोधिक मेद ही पोषण द्रव्य असतात. आळंबीच्या लागवडीचे प्रात्यक्षिक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.

Web Title: Demonstration of agriculture students