यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने कोराेनाच्या संकट काळात जिल्ह्यात वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, वॉर्ड बॉय, स्टॉफ नर्स, आदी जवळपास ४०० जणांना रुग्णांच्या सेवेसाठी कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आले होते. कोरोना संपुष्टात आल्याच्या कारणावरून या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात येत आहे. काहींना कमी केले आहे. सध्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदांवर या अनुभवी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रूजू करून घेतल्यावर शासनास प्रशिक्षित झालेले कर्मचारी उपलब्ध होऊ शकतील. शिवाय शासनाला प्रशिक्षणांवरील खर्चही करावा लागणार नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील कोरोना योद्धांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, असेही या निवेदनात दुर्रानी यांनी म्हटले आहे.
कोरोना योद्ध्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST