रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST2021-02-11T04:19:19+5:302021-02-11T04:19:19+5:30

परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात झालेले अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ...

Delete encroachments on hospital premises | रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे हटवा

रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे हटवा

परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात झालेले अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी आगीच्या दोन घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील लाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देवीदास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळसाहेब नागरगोजे यांच्यासह बांधकाम विभागाचे उपअभियंता, विद्युत निरीक्षकांची उपस्थिती होती. रुग्णालयाच्या परिसरात झालेले अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावे, या भागात वाहनतळाची सुविधा करावी, रुग्णालयात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करावे, आवश्यक त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, सर्व खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, रुग्णांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक बसवावेत, धूरशोधक उपकरण बसवावे, नो पार्किंगच्या जागेत उभ्या केेलेल्या वाहनांवर कारवाई करावी आदी सूचना केल्या.

Web Title: Delete encroachments on hospital premises