CoronaVirus : परभणीत नाकाबंदी धुडकावणाऱ्या अधिकाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 03:24 PM2020-04-14T15:24:50+5:302020-04-14T15:25:44+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर

CoronaVirus: Police chases excise dept officer due to breaking of Nakabandi | CoronaVirus : परभणीत नाकाबंदी धुडकावणाऱ्या अधिकाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग

CoronaVirus : परभणीत नाकाबंदी धुडकावणाऱ्या अधिकाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग

Next
ठळक मुद्देयेलदरी - सेनगाव रस्त्यावरील थरार

येलदरी (जि.परभणी) : जिल्ह्याच्या सिमेवरील नाकाबंदीला न जुमानता भरधाव वेगाने स्कॉर्पिओ कार घेवून जाणाºया राज्य उत्पादन शुल्काच्या दुय्यम निरीक्षकाचा पोलिसांनी २ किलो मीटर पाठलाग करून त्याला थांबविल्याचा थरार मंगळवारी दुपारी १२़३० च्या सुमारास येलदरी - सेनगाव रस्त्यावर घडला़ 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व सिमांवर कडकडीत बंदोबस्त लावण्यात आला आहे़ जिल्हा  ग्रीनझोन मध्ये असल्याने महसुल व पोलीस यंत्रणा अतिशय दक्ष झाली आहे़ अशातच जिल्ह्याच्या सिमेवर सातत्याने परजिल्ह्यातील नागरिक प्रवेश करण्याचा खटाटोप करीत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे़ त्यात मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांच्या बेजबाबदारीमुळे भर पडल्याचा प्रकार पहावयास मिळाला़ येलदरीहून सेनगावकडे जाणाºया जिल्हा सिमेवर जिंतूर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे़ १४ एप्रिल रोजी दुपारी १२़३० च्या सुमारास एमएच ३८-७३५६ क्रमांकाची स्कॉर्पिओ येथील तपासणी नाक्यावर न थांबता येलदरीहून हिंगोली जिल्ह्यातील सेनगावकडे भरघाव वेगाने बॅरिगेट मधून निघून गेली़ यावेळी येथे कर्तव्यावर असलेले जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक लोखंडे, फड यांनी तातडीने २ किलो मिटर या गाडीचा दुचाकीवर पाठलाग केला़ त्यानंतर ही गाडी थांबविली व याबाबत सदरील वाहनचालकास जाब विचारत असतांना या गाडीमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक बालाजी हिप्परगेकर उतरले़ त्यानी आपण राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी असल्याचे सांगितले़ अवैद्य दारू संदर्भात एक हिंट मिळाल्याने आपण कारवाईसाठी जात असल्याचे हिप्परगेकर म्हणाले़ त्यावर लोखंडे यांनी नाक्यावर गाडी का थांबविली नाही, असे विचारले असता चालक मोबाईलवर बोलत होता असे त्यांनी सांगितले़ त्यावर लोखंडे यांनी अशी बेजाबदारी खात्याचे अधिकारी करीत असतील तर, कसे चालेल? असा सवाल उपस्थित केला़ दिवसरात्र पोलीस तपासणी नाक्यावर तैनात आहेत़ हिंगोली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला आहे़ त्यामुळे सर्व यंत्रणा दक्ष झाली असतांना आपली ही पोलिसांना सहकार्य न करण्याची भूमिका चुकीची असल्याचे ते म्हणाले़ त्यानंतर ही गाडी पुढील मार्गाने निघून गेली़ 
    जिल्ह्याच्या सिमेवरील बंदोबस्त आणखी कडक करा - प्रमोद चव्हाण
परभणी जिल्ह्याच्या सिमेवरील बदोबस्त आणखी कडक करणे आवश्यक आहे़ बरेच नागरिक हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येत असल्याचे पहावयास मिळत आहे़ त्यामुळे प्रशासनाने या बाबींची दखल घेवून परजिल्ह्यातील  एकही नागरिक परभणी जिल्ह्यात येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे असे येलदरीचे सरपंच प्रमोद चव्हाण यांनी सांगितले़

Web Title: CoronaVirus: Police chases excise dept officer due to breaking of Nakabandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.