शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ९४ गावांसाठी केवळ ५३ कर्मचारी; सेलूचा आरोग्य विभाग हिंमतीने देतोय कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:28 IST

सेलू तालुक्यातील १४ गावात  आशाताईची नियुक्ती नाही.

ठळक मुद्देतालुक्यात बाहेर जिल्ह्यातील येणाऱ्यांची संख्या अधिक

सेलू:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. उपलब्ध  डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या हिंमतीने दिवसराञ  काम करून कोरोनाचा मुकाबला तुटपुंज्या मनुष्यबळ असतानाही करत आहेत.

देशात लॉकडाऊन केलेल्या नंतर पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक आदी महानगर आणि विविध राज्यात मुजरी करणारे हजारो स्थलांतरीत ग्रामस्थांचे लोंढे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या यंञणेवर मोठा ताण आला आहे.  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैघकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आरोग्य सहाय्यक बाहेर गावाहून परतलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम करत आहेत.

 सेलू तालुक्यात वालूर आणि देऊळगाव हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. वालूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १४ उपकेंद्र आणि  ५२ गावे आहेत तर देऊळगाव अंतर्गत १२ उपकेंद्र असून ४२गावांचा  समावेश आहे. एकूण ९४ गावात विविध शहरातून दाखल झालेल्या ग्रामस्थांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. संशयित आढल्यास संबंधित व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. सद्यस्थितीत १५ आरोग्य सेवक, २३ आरोग्य सेविका, ९ कंञाटी कर्मचारी २ आरोग्य सहाय्यक ५ वैघकीय अधिकारी तपासणीच्या कामात आहेत. तसेच प्रत्येक गावातील बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांची वारंवार माहिती घेत आहेत. दरम्यान,  कोरोनाना मुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत. 

त्या दोघांचा अहवाल निगेटिव्ह पुणे येथून परतलेल्या चिकलठाणा बु आणि हातनूर येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा स्वॅब आरोग्य विभागाने घेतला होता. या दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील ९४गावात आजपर्यंत ३हजार ४२८ स्थलांतरित ग्रामस्थ परतले आहेत. दररोज बाहेर गावाहून लोक परतत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, आणि ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभत आहे. उपलब्ध आरोग्य विभागातील कर्मचारी सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. केवळ बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रावजी  सोनवणे यांनी केले.

 

१४ गावांना आशाताईची नियुक्ती नाही गाव पातळीवर आरोग्यच्या दृष्टीने काम करणा-या आशाताईची भूमिका महत्त्वाची  आहे. त्यांना  त्यांच्या कामावर मोबदला दिला जातो.  गावातील महिला आणि वृध्दाच्या आरोग्याची काळजी घेत असतात. तसेच आरोग्य विभागाला त्यांची चांगली मदत होते. माञ सेलू तालुक्यातील  खादगाव, सोनवटी, तळतुंबा, वाघ पिंप्री, लाडनांद्रा, पिंप्रुळा,मापा,  पार्डी, आडसर, नांदगाव,  कुंभारी,  बोरगाव जहागिर,  शिंगठाळा  या १४ गावात आशाताईची नियुक्ती झालेली नाही. शासनाकडे या संदर्भातील प्रस्ताव पडून आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ज्या गावात आशाताई नाहीत. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाची मदत आरोग्य विभागला  घ्यावी लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी