शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : परभणीत आणखी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 14:41 IST

जिल्ह्यात आत्तापर्यंत ७४३ कोरोनाचे रुग्ण

ठळक मुद्दे ३९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

परभणी: जिल्ह्यात आणखी २ कोरोनाबाधित व्यक्तींचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४४ झाली आहे.

परभणी तालुक्यातील नांदापूर येथील एका ८८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी ४ आॅगस्ट रोजी दुपारी १.४९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या व्यक्तीचा ५ आॅगस्ट रोजी सकाळी १०.४९ वाजता मृत्यू झाला. तसेच सेलू तालुक्यातील राजवाडी येथील ६० वर्षीय संशयित महिलेस पोटाचा त्रास होत असल्याने ४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे या महिलेची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात या महिलेचा अहवाल निगोटिव्ह आला. त्यानंतर स्वॅब घेऊन तो नांदेड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

सदरील महिलेवर उपचार सुरु असतानाच मंगळवारी रात्री  १०.१५ वाजता तिचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १ वाजता या महिलेचा स्वॅब अहवाल प्राप्त झाला. त्यात ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यात आता एकूण मयतांची संख्या ४४ झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ७४३ कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यातील ३९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस