शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : परभणीत तीन दिवसांसाठी सर्व दुकानांना परवानगी; २४ तासात बदलले संचारबंदीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 20:14 IST

परभणी जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे १ जून पासून संपूर्ण बाजारपेठ सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती.

परभणी : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर २४ तासात संचारबंदीच्या आदेशात बदल करण्यात आले असून, ४ जूनपर्यंत बाजारपेठेतील सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात ३१ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग कमी आहे, अशा जिल्ह्यात सूट देण्याचे निर्देश राज्य स्तरावरून दिले होते. परभणी जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे १ जून पासून संपूर्ण बाजारपेठ सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र ३१ मे रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अत्यावश्यक सेवेतील किराणा आणि भाजीपाला वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. १ जून रोजी विविध लोकप्रतिनिधी तसेच व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली.लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांचा पाठपुरावा व सध्याची व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवे आदेश काढले. सर्व आवश्यक गटात समावेश नसलेली इतर दुकाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत झाले असून, त्यानुसार २ ते ४ जून या तीन दिवसांसाठी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आवश्यक गटात समावेश नसलेले इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली जात असल्याचे आदेशात म्हटले आहे. शनिवार व रविवार रोजी ही दुकाने बंद राहतील. जिल्हा प्रशासनाच्या या आदेशामुळे व्यापाऱ्यांना किमान तीन दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी