शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना वाढला; सॅनिटायझरचा वापर मात्र घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मागच्या एक महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी जिल्ह्याच्या बाजारपेठेत सॅनिटायझरच्या मागणीला उठाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : मागच्या एक महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी जिल्ह्याच्या बाजारपेठेत सॅनिटायझरच्या मागणीला उठाव आलेला नाही. सॅनिटायझरचा वापर लक्षणीयरित्या कमी झाला असून, ही बेफिकिरी संसर्ग वाढविण्यासाठी धोकादायक ठरु शकते.

मागील वर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात सॅनिटायझरला मोठी मागणी होती. बाजारपेठेत सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण होण्यापर्यंत स्थिती निर्माण झाली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांचा बेफिकिरीपणा वाढला आहे. सॅनिटायझरचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या क्वचितच दिसून येत आहे. बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्यांची आणि माफक दरातील सॅनिटायझर्स उपलब्ध आहेत. मात्र या सॅनिटायझरला फारशी मागणी नाही. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक २० मिनिटांना हात धुण्याच्या केलेल्या आवाहनाचे किती जण पालन करतात? हाही प्रश्न निर्माण होत आहे. काहीही असले तरी नागरिकांनी नियम पाळले नाही तर त्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आता त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे.

मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यावेळी दुकानदारांकडे स्टॉक शिल्लक राहणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची विक्री झाली होती. मागणी मोठ्या प्रमाणात होती.

विशेष म्हणजे ठराविक कंपनीचे सॅनिटायझर मिळविण्यासाठी अनेक जण शहरात विविध दुकाने फिरून ते सॅनिटायझर मिळवित होते. आता तेच सॅनिटायझर सर्वत्र उपलब्ध असताना मागणी नाही.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ९० टक्क्यांनी सॅनिटायझरची मागणी घटली आहे. औषधी दुकानांमध्ये सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात साठा आहे; मात्र त्यास ग्राहकांची मागणी नाही.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी नागरिक प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे हा प्रकार वाढला आहे. धोका टाळण्यासाठी सॅनिटायझर वापर करणे आवश्यक आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निश्चितच सॅनिटायझरची विक्री घटली आहे. बाजारात मुबलक प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध आहे. उच्चशिक्षित वर्ग आजही सॅनिटायझरचा वापर करतो. इतर काही जण साबणाने हात धूत असतील, असे गृहीत धरता येईल. सॅनिटायझरची मागणी घटली आहे.

सूर्यकांत हाके,

केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असो.