शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची शक्‍यता या गोष्टी लक्षात घेऊन महावितरणने वीजपुरवठा ...

परभणी : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची शक्‍यता या गोष्टी लक्षात घेऊन महावितरणने वीजपुरवठा खंडित करु नये, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

यासंदर्भात महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. त्यात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित अतिगंभीर रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व खांबावरील पथदिवे सुरळीतपणे सुरु असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी संबंधित सर्व आस्थापना व सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांच्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी संबंधित इन्सिडेंट कमांडर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेण्यात यावी तसेच या आस्थापनांच्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी, असेही आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.