सेलू येथील शाम प्रकाश झोल यांनी त्यांची (एमएच १४ जे ८०२६) क्रमांकाची दुचाकी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घरासमोर उभी केली होती. दोन तासांनी ते घराबाहेर आले असता, त्यांना त्यांची दुचाकी गायब असल्याचे दिसून आले. इतरत्र शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. याबाबत त्यांनी सेलू पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना मानवत येथे घडली. शहरातील गणेशनगर भागातील व्यापारी आशिष रामनिवास मुंदडा यांनी १० एप्रिल रोजी त्यांची (एमएच २२ एएच ३१६१) क्रमांकाची दुचाकी दुपारी अडीच वाजता घरासमोर उभी केली होती. दोन तासानंतर त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता, त्यांना दुचाकी जागेवर दिसली नाही. याबाबत त्यांनी मानवत पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सेलू, मानवतमधून दुचाकी चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST