शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाईन स्वीकारले जाणार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:22 IST

परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीत ३० डिसेंबर रोजी ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी दिल्या आहेत. ...

परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीत ३० डिसेंबर रोजी ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी दिल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ थांबणार आहे.

जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरचा एक दिवस शिल्लक आहे. यावेळच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले. मात्र, २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून निवडणूक आयोगाच्या सर्व्हरची गती कमी झाल्याच्या तसेच तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नयेत. तसेच त्यांना निवडणूक लढविण्याची संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने ३० डिसेंबर रोेजी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अर्ज स्वीकारण्याच्या वेळेतही वाढ करण्यात आली असून, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.

त्यामुळे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारण्याच्या व वाढीव वेळेच्या सूचना द्याव्यात. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्राचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध करुन द्यावेत, असे सूचित करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये आर. ओ. लॉगीनमधून भरुन घ्यावेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.