शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

परभणी सिटी सर्व्हेसाठी दिल्लीचे ४५ जणांचे पथक दाखल

By राजन मगरुळकर | Updated: October 11, 2022 12:39 IST

पंधरा दिवस केली जाणार विविध ठिकाणांची पाहणी

- राजन मंगरुळकरपरभणी : भारत सरकारच्या संसदेच्या राष्ट्रीय महत्त्व विशेष संस्थांनच्यावतीने दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरचे ३८ विद्यार्थी आणि ७ प्राध्यापक यांचा समावेश असलेले ४५ जणांचे पथक शहराच्या सर्व्हेसाठी परभणीत दाखल झाले आहे. सोमवारी शहरात आलेल्या या पथकाकडून पुढील १५ दिवस विविध ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. 

तीन लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील तीन शहरांची निवड या पथकाने केली आहे. यात अहमदनगर, जालना आणि परभणीचा समावेश आहे. दिल्ली येथून राष्ट्रीय महत्त्व संस्थानचे हे पथक परभणीत दाखल झाले आहे. यात स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरचे ३८ विद्यार्थी आणि सात प्राध्यापक यांचा समावेश आहे. घर बांधणी, वाहतूक व्यवस्था, प्रदूषण, पर्यटन, टाऊन प्लॅनिंग, शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध बाबींचा सर्वे या पथकाकडून केला जाणार आहे. सध्याची शहराची वाहतूक व्यवस्था, शहरातील रस्ते, अंतर्गत वसाहतीतील घरे, स्लम एरिया, पार्किंगची समस्या, रिंग रोड, बायपास रस्ता, दुर्घटना घडणारे ब्लॅक स्पॉट, पादचारी पथ आणि वाहतूक व्यवस्थेशी संबंधित अशा विविध बाबींचा सर्वे या पथकाकडून केला जाणार आहे. 

शहराच्या विकासाला व आगामी काळातील वीस वर्षाचे नियोजन करण्यासाठी गती देणारे रोल मॉडेल या पथकाकडून तयार केले जाणार आहे. या सर्वेेची माहिती टाऊन प्लॅनिंग विभागाकडे व भारत सरकारच्या संबंधित मंत्रालय स्तरावर आगामी दोन महिन्यांमध्ये दिली जाणार आहे. या पथकाचे निदेशक पी.एस.एन.राव हे असून परिवहन विशेषज्ञ प्राध्यापक सेवाराम हे विद्यार्थ्यांसह परभणीत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून शहर हद्दीत सर्व ठिकाणी पाहणी आणि सर्वे केला जाणार आहे.

आज महामार्गावर केली जाणार पाहणीपाथरी रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, वसमत रोड या मार्गावर रिंग रोड असणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांची नोंदणी आणि रिंग रोडची असलेली गरज या बाबतचा सर्वे या पथकाकडून आज शहर वाहतूक शाखेच्या मदतीने केला जाणार आहे.

अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या भेटीविभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाने परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह संबंधित संसद प्रतिनिधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. सोमवारी काही ठिकाणी पथकाने भेटीही दिल्या. शहरातील समस्या, सध्याची परिस्थिती समजून घेत हा सर्वे पूर्ण केला जाणार असल्याचे परिवहन विशेषज्ञ प्रा.सेवाराम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

या बाबींचा होणार सर्व्हेशहरातील रस्ते, वाहतुकीसाठीची साधने, वाहनांची संख्या, पार्किंगच्या जागा, ब्लॅक स्पॉट, महामार्ग अंतर्गत रस्ते, पादचारी पथ, सडक सुरक्षितता, रिंग रोड, बायपास आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन शहरातील सुविधा व तांत्रिक बाबींची माहिती पथकातील विद्यार्थी, विद्यार्थिनी गोळा करणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका