शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात २३ जणांचा मृत्यू; ६२० बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST

परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी २३ रुग्णांचा ...

परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी २३ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये १५ पुरुष व आठ महिलांचा समावेश आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालयात ४, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ७, जिल्हा परिषद हॉस्पिटलमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मृत खासगी दवाखान्यातील आहेत. शुक्रवारी दिवसभरात ६२० रुग्णांची नोंद झाली, तर ६८४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ हजार ७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ३३ हजार ३०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ६ जणांचा मृत्यू झाला असून, ७ हजार ७६३ रुग्ण विविध आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामध्ये परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २१७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४४, जिल्हा परिषद हॉस्पिटलमध्ये २४७, रेणुका मंगल कार्यालय येेथे १०७, अक्षदा मंगल कार्यालय येेथे १३२ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच होम आयसोलेशनमध्ये ६ हजार ४०६ जण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आहे.

सात दिवसांतील कोरोनामुक्त

१ मे १२११

२ मे ५१२

३ मे १२२०

४ मे ९४३

५ मे ८०४

६ मे ६३९

७ मे ६८४