शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

झेंडर

By admin | Updated: March 12, 2015 14:47 IST

वाट्टेल ते ट्रान्सफर करा, जलद आणि फुकट!

 
जसजसा स्मार्ट फोनचा वापर वाढत चालला आहे, तसतशा मोबाइल वापरण्याच्या जुन्या पद्धती मागे पडत चालल्या. जसे काही वर्षांपूर्वी आपल्याला मित्रांसोबत एखादे गाणे किंवा फोटो अथवा फाईल शेअर किंवा ट्रान्सफर करायची असल्यास सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ब्ल्यू टूथ. म्हणजे दोन्ही स्मार्ट फोनमधील ब्लू टूथ चालू करून आपण आपल्या मित्राला हवी असलेली फाईल ट्रान्सफर करीत असू; मात्र स्मार्ट फोन वापरणार्‍यांची भूक वाढली आणि आता आपण फक्त फाईल किंवा गाणे किंवा फोटोच ट्रान्सफर करीत नाही, तर मित्रांना आता आपल्या स्मार्ट फोनमध्ये असलेला संपूर्ण चित्रपट हवा असतो किंवा मित्राच्या वाढदिवसाचे केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हवे असते. या सर्वांची फाईल ही काही शेकडो एम.बी.मध्ये किंवा जी.बी.मध्येसुद्धा असते. अशा वेळी जर या फाईल्स आपण ब्ल्यू टूथच्या माध्यमातून एकमेकांना ट्रान्सफर केल्या तर यामध्ये प्रचंड वेळ जातो. एवढी मोठी व्हिडीओ फाईल ईमेल करू शकत नाही किंवा व्हॉट्सअँपच्या माध्यमातून शेअर करू शकत नाही; कारण याला फाईल साइजच्या र्मयादा आहेत; फाईल तर मित्राला पाठवायची आहे; मग कसे करणार? मात्र तुमची ही समस्या सोडविण्यासाठी एक अँण्ड्रॉईड अँप तुम्हाला मदत करील; त्याचे नाव आहे - झेंडर (Xender - Share, Transfer).
 
काय आहे हे अँप? 
 
 १) झेंडर हे अँप गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध असून, जगभरात जवळपास पन्नास लाखांहून अधिक यूर्जस झेंडर फाईल ट्रान्सफरसाठी वापरतात.
२) झेंडर अँपच्या माध्यमातून फाईल ट्रान्सफर करण्यासाठी कुठल्याही केबलची गरज नाही किंवा इंटरनेट अथवा वायफाय कनेक्श्नचीही गरज नाही. कुठलाही छुपा डेटा युजेस यामध्ये होत नाही. याच झेंडर अँपला पूर्वी फ्लॅश ट्रान्सफर या नावानेदेखील ओळखले जायचे.
३) झेंडर अँपच्या मदतीने तुम्ही काहीही ट्रान्सफर करू शकता. जसे की, तुमच्या स्मार्ट फोनमधील कॉन्टॅक्ट, फाईल्स, फोटोज्, गाणी, विविध प्रसंगांचे फाईल, साइज जास्त असलेले फोटो, एवढंच काय तुम्ही अँपसुद्धा तुमच्या मित्रांच्या स्मार्ट फोनमध्ये ट्रान्सफर करू शकता.
४) झेंडरच्या फाईल ट्रान्सफरचा स्पीड हा ब्ल्यू टूथपेक्षा पन्नास पटीने अधिक असतो. म्हणजे एखादा अख्खा चित्रपट जरी ट्रान्सफर करायचा असला तरी काही मिनिटांतच ट्रान्सफर करू शकता. तुमच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ, ज्याची साईज ही जीबी आहे, तोही सहजगत्या तुम्ही झेंडरच्या मदतीने तुमच्या मित्राला पाठवू शकता.
५) झेंडरचे अजून एक महत्त्वाचे फीचर म्हणजे तुम्ही एकाच वेळी पाच वेगवेगळ्या मित्रांना एखादी फाईल ट्रान्सफर करू शकता. अर्थात, पाच वेगवेगळ्या डिव्हाईसेसला एकाच वेळी फाईल ट्रान्सफरची सुविधा हे अँप तुम्हाला देते. यालाच आपण ग्रुप शेअरिंग म्हणू शकतो.
६) झेंडरचे अजून एक जादूई फीचर म्हणजे याचा असलेला क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट. याचा अर्थ तुमच्याजवळ अँण्ड्रॉईड मोबाइल आहे आणि तुमच्या ज्या मित्राला फाईल ट्रान्सफर करायची आहे त्याच्याकडे आयफोन आहे; तरीसुद्धा काळजी करण्याची गरज नाही. कारण यामध्ये अँण्ड्रॉईड स्मार्ट फोनमधून आयफोनमध्ये आणि आयफोनमधून अँण्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये फाईल ट्रान्सफर करता येते.
७) आजकाल नवीन स्मार्ट फोन बाजारात आला की, तो विकत घेणारे अनेक हौशी मंडळी आहेत. नवीन स्मार्ट फोन विकत घ्यायला काहीच वेळ लागत नाही; मात्र खरा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे तुमच्या जुन्या स्मार्ट फोनमधील तुमचे कॉन्टॅक्ट, डेटा, अँप्स आदिंचा. कॉन्टॅक्ट आणि डेटा तर कसा तरी ट्रान्सफर करता येतो; पण अँप मात्र परत डाऊनलोड करा किंवा इन्स्टॉल करा. म्हणजे डोक्याला ताप तर होतोच; शिवाय वेळ जातो तो वेगळाच! मात्र या समस्येवर रामबाण उपाय या झेंडर अँपमध्ये आहे. यामध्ये फोन रिप्लिकेट नावाचे एक फीचर आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्ट फोनमधील डेटा, फाईल्स, अँप, गाणी, व्हिडीओज् अगदी काही क्लिकमध्ये नवीन स्मार्ट फोनमध्ये ट्रान्सफर करू शकता.
झेंडर (Xender - Share, Transfer)हे हिंदी भाषेतसुद्धा उपलब्ध आहे.
 
- अनिल भापकर
  anil.bhapkar@lokmat.com