मीच का घ्यावी माघार?

By Admin | Updated: June 4, 2015 14:46 IST2015-06-04T14:46:36+5:302015-06-04T14:46:36+5:30

खूप राग येतो, खूप संताप होतो, अशी का वागतात माझयाजवळची माणसं? सतत मला गृहीत धरतात, सतत माझ्याकडून अपेक्षा ठेवतात, मीच का त्यांना समजून घ्यायचं? मीच काय म्हणून दोन पावलं मागे घ्यायचं?

Why should I retire? | मीच का घ्यावी माघार?

मीच का घ्यावी माघार?

***
काय म्हणून मीच घ्यावी माघार?
चूक माझी असो, नसो?
मीच काय म्हणून काढावी समजून इतरांची.
काय म्हणून मीच म्हणावं सॉरी
आणि सोडून द्यावं झालं गेलं ते.
विसरून जावेत सारे क्लेश,
उतरवून ठेवावेत सारे
वेदनांचे भार.
मीच काय म्हणून
घ्यावी माघार?
***
मीच नेहमी इतरांचं मन वाचायचं,
मीच नेहमी सगळ्यांचं ऐकून घ्यायचं,
मीच म्हणायचं, कळतात मला तुमची दु:ख,
मीच लावायचा कायम मलम
किंवा मीच घालायची कायम फुंकर.
पण का मीच का?
**
मला काय मन नाही,
मला का वेदना नाहीत,
मला नाहीत का मान-अपमान
मला नाही का होत त्रस
मलाही आहेच ना स्वाभिमान
दुखावतो माझाही इगो,
पडतात माङयाही मनालं घर,
त्रस होतो मला.
आणि तरीही मीच का?
मीच काय म्हणून घ्यायची माघार?
***
आहे याचं उत्तर कुणाकडे?
खरंतर सोपंय उत्तर.
आपल्याला हवी असतात आपली माणसं,
आपल्याला हवी असते, त्यांची साथ
आपल्यालाही माहिती असतं की, 
आपण दुखावतो त्यांचं मन तेव्हा ते ही देतात आपल्याला आधार.
म्हणून खरंतर न करता त्रगा.
सांगावं स्वत:ला.
हो मीच, मीच घेईन कायम माघार.
कारण,
माझ्यासाठीही कुणीतरी घेतंच असतं अशी माघार.मला कळत नसलं तरीही.

Web Title: Why should I retire?