आता व्हॉट्सअॅप आपल्याला THANKS म्हणणार आहे... का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:11 PM2020-07-09T18:11:33+5:302020-07-09T18:13:24+5:30

लॉकडाऊनच्या काळात आपण व्हॉट्सअॅपवर पडीक होतो, इट्स बिटविन यू !

WhatsApp advertisement its between you.. | आता व्हॉट्सअॅप आपल्याला THANKS म्हणणार आहे... का?

आता व्हॉट्सअॅप आपल्याला THANKS म्हणणार आहे... का?

Next
ठळक मुद्देअशी काही विशेष मोहीम राबवली जाण्याची ही बहुदा भारतातील पहिलीच वेळ असावी.

सबुकने व्हॉट्सअॅप विकत घेतलंय हे तर सर्वानाच माहिती आहे. त्यानंतर त्यात मोठय़ा प्रमाणावरती बदलही करण्यात आले. व्हॉट्सअॅप अधिक यूजर फ्रेंडली बनवणं, जास्तीत जास्त सोयी सुविधा यूजर्सर्पयत पोहोचवणं हे त्याचं उद्दिष्ट. आता या कोरोना व्हायरसमुळे आलेल्या जागतिक संकटात, जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला. आजही अनेक देशातील मोठय़ा आणि छोटय़ा शहरात, गावखेडय़ात लॉकडाऊन चालूच आहे.
माणसं घरात अडकलेली आहेत. कोणी एकटी पटली आहेत, कोणाला सतत नातेवाइकांची, जवळच्या आप्तांची चिंता लागून राहिलेली आहे, कोणाला त्यांचा आवाज ऐकायचा आहे, तर कोणाला त्यांना बघायचं आहे. ते व्हॉट्सअॅपवर एरव्हीही संपर्कात आहेतच.
तर आता त्यापुढे जाऊन एका खास मोहिमेद्वारे आता व्हॉट्सअॅप वापरून करोडो भारतीय कसे एकमेकांच्या संपर्कात राहिले. व्हॉट्सअॅप मेसेजिंग, व्हॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग या सुविधांमुळे लोकांच्या चिंता, एकटेपणा कसा दूर झाला हे सर्व काही या विशेष मोहिमेद्वारे दाखविण्यात येणार आहे.
या मोहिमेला इट्स बिटविन यू असं नाव देण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप इट्स बिटविन यू या ब्रँड मोहिमेसाठी बॉलिवूडची दिग्दर्शक गौरी शिंदे आणि जाहिरात एजन्सी बीबीडीओ इंडियाची निवड केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कंपनी काही जाहिराती दाखवेल.
भारतात व्हॉट्सअॅप सक्रिय वापरकत्र्याची संख्या 4क्क् दशलक्षाहून अधिक आहे आणि व्हॉट्सअॅप भारत एक किती महत्त्वाची मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअॅपने या आधी अशी मोहीम फक्त ब्राङिालमध्ये राबवलेली होती.
या मोहिमेतल्या जाहिराती विविध चॅनल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती पुढील दहा आठवडे चालवल्या जाणार आहेत. एखाद्या सोशल प्लॅटफॉर्मतर्फे अशी काही विशेष मोहीम राबवली जाण्याची ही बहुदा भारतातील पहिलीच वेळ असावी.

शरीरात चिप? - तंत्रज्ञानाचा असाही  भलताच वापर.


 जगभरातच कोरोना आणि त्यासंदर्भातल्या बातम्या, व्हिडिओ, कोरोनाशी मुकाबला करणारे तंत्नज्ञान यांचीच सतत चर्चा होत असतानाच, तिकडे मिशिगनच्या संसदेने एक अनोखा कायदा संमत करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मिशिगनच्या संसदेने नुकताच ‘मायक्र ोचिप प्रोटेक्शन’ कायदा संमत केला, यामुळे आता तेथील कंपन्यांना आपल्या कर्मचा:यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारची मायक्र ोचिप बसवता येणार नाही. जगाच्या कोण्या भागात अशा चिप बसवणा:या कंपन्या आहेत, त्या बसवून घ्यायला मान्यता देणारे कर्मचारी आहेत आणि मुळात असं काही तंत्नज्ञान आहे हीच बातमी अनेकांसाठी नवी होती. सन 2017 मध्ये खासगी कंपन्यांनी एक नियम लागू केला होता, ज्या अंतर्गत कर्मचा:यांच्या शरीरात आरएफआयडी मायक्र ोचिप बसविण्यात आली होती. जेव्हा कर्मचारी या चिप्ससह कंपनीत प्रवेश करतात तेव्हा कंपनीचे विविध दरवाजे आपोआप उघडतात आणि कर्मचारी त्यांच्या जागी बसल्यावर त्यांच्या टेबलावरील लॉक असलेले संगणक चालू केले जातात. या व्यतिरिक्त कंपन्या या चिप्सद्वारे आपल्या कर्मचा:यांवर नजर ठेवत असत अशीदेखील जोरदार चर्चा आहे. या विशेष तंत्नज्ञानाच्या मायक्रोचिप्सचा आकार तांदळाच्या दाण्याएवढा आहे आणि त्यांची किंमत 23 हजार रु पये आहे. या चिप्स शस्रक्रि येद्वारे हाताच्या कोणत्याही भागावर लावल्या जाऊ शकतात. या चिप्सच्या मदतीने दरवाजे उघडण्यापासून ते पैशाचे व्यवहार करण्यापर्यंत अनेक कामे केली जाऊ शकतात. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कंपन्या यापुढे आपल्या कर्मचा:यांना अशा चिप लावण्यास भाग पाडू शकणार नाहीत अथवा दबाव टाकू शकणार नाहीत. अद्याप हे विधेयक पूर्णपणो कायद्यात रूपांतरित झालेले नाही, त्यासाठी ते अमेरिकन सिनेटमध्ये पास होणं आवश्यक आहे.

Web Title: WhatsApp advertisement its between you..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.