कसलं संशोधन आणि कसल्या पिएचड्या?

By admin | Published: April 11, 2017 06:56 PM2017-04-11T18:56:47+5:302017-04-11T18:56:47+5:30

विद्यपिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामधे संशोधन चालतं का?

What kind of research and what? | कसलं संशोधन आणि कसल्या पिएचड्या?

कसलं संशोधन आणि कसल्या पिएचड्या?

Next

विद्यपिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामधे संशोधन चालतं का? खरंच आपण संशोधन करतो का? का नुस्ताच बाजार मांडलाय या संशोधन शब्दाचा.
आजकाल प्रत्येक विद्यापीठातुन शेकडो विद्यार्थी , शिक्षक, प्राध्यापक पीएचडी/ डॉक्टरेट पदवी घेऊन बाहेर पडतात. पण खरंच ते संशोधन करतात का? त्यांचे मार्गदर्शक यांचे आप्लिकेशन कुठे आहे याचा पाठपुरावा करतात का? किंवा या संशोधनाचे अ‍ॅप्लिकेशन कुठे आढळून येते का? तर याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल, कमीतकमी विद्यपिठातील संशोधनासाठी तरी नाही हेच उत्तर योग्य!
कारण प्राध्यापक हा संशोधन/पीएचडी हे फक्त इन्क्रिमेण्ट आणि प्रमोशन साठीच करतो, त्याचा मुळ पेशा शिकवणे/आहे हे मात्र काहीजण विसरतात. संशोधनापुढे टीचिंग हे शून्य असेच विद्यापीठ मानते, त्यावरच प्राध्यापकाचे महत्त्व विद्यापीठ ठरवते. मग प्राध्यापक तरी काय करणार, तेही लागतात संशोधनाच्या मागे.
इंग्रजी मधे संशोधन म्हणजे रीसर्च. ते होतं का?
पेड जर्नलला पाठवणे,ते पेपर म्हणून छापुन आनने, बस्स झाले तुमचे संशोधन. प्राध्यापकाच्या नावामागे पेपर वाढणार अन विद्यापीठ पण त्या पेपरचे पॉइंट्स देणार. ,पुढे जाउन हेच पॉइंट्स प्रमोशन साठी उपयोगात येणार. मग काय याचप्रकारे चालतं हे संशोधन. याच संशोधनाला वापरून अजुन कुणीतरी दोन-चार पेपर पब्लिश करणार. प्रथम संशोधन करणाऱ्याची महती वाढनार. मग काय झाला ना तो फेमस.
मग काय गूगल वर त्याच्या पेपरचे रिव्ह्यूज अन सिटीशन वाढणार, मग इन्क्र ीमेंट अन प्रमोशन. खरे पाहिले तर त्या संशोधनाचा ना कुठल्या खऱ्या संशोधनासाठी उपयोग ना समाजासाठी उपयोग, फक्त पेपर चा काउंट वाढनार. यामुळे खरा शिक्षक/प्राध्यापक हा शिकवण्यापासून कुठे तरी दूर जाणार.
सगळेच असं करतात असं नाही, काही सन्माननीय अपवाद आहेतच. पण संशोधन अशा रीतीनं करणाऱ्यांचं प्रमाण मात्र वाढतं आहे. 
प्रा. महेश मधुकरराव जानोळकर, अमरावती 

Web Title: What kind of research and what?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.